24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरकर्मचा-यांच्या आंदोलनास काँग्रेस, मनसेचा पाठिंबा

कर्मचा-यांच्या आंदोलनास काँग्रेस, मनसेचा पाठिंबा

निलंगा : प्रतिनिधी

येथील पंचायत समिती येथे पगारवाढ व निवृत्ती वेतनासाठी आंदोलन करणा-या कर्मचा-यांंना काँग्रेस, मनसे व सरपंच संघटनेने पाठींबा दिला आहे. मंगळवारपासून आम्ही आंदोलन करतोय परंतु अद्याप आम्हाला गटविकास अधिका-यांंनी भेट दिली नाही, असे कर्मचा-यांनी सांगितले. डॉ भिकाणे यांनी गटविकास अधिकारी सोपान अकेले यांना फोन करून कर्मचा-यांंचे गा-हााणे ऐकण्यासाठी येण्यास सांगितले असता गटविकास अधिकारी आले व त्यांनी कर्मचा-यांच्या समस्या ऐकून तसे पत्र मंत्री व मुख्य कार्यकारी अधिका-यांना पाठवणार असल्याचे सांगितले. या प्रकरणी गरज पडली तर हा विषय राज ठाकरे यांच्याही कानावर घालून त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांना बोलायला सांगू असेही आश्वासन दिले. यावेळी तालुक्यातील ग्रामसेवक,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मनसे तालुकाध्यक्ष सुरज पटेल आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे , डॉ बलभीम सूर्यवंशी , माधवराव पाटील , गोंिवद सूर्यवंशी , दयानंद चोपणे आदीसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून उपोषण कर्त्यांना पांिठबा दिला. तसेच महाराष्ट्र राज्य सरपंचसेवा महासंघानेही पाठींबा दिला. यावेळी सरपंच सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष पंकज शेळके, दापका ग्रामपंचायतचे लाला पटेल , शेडोळ सरपंच स्वरूप धुमाळ , शेंदचे रमेश मोगरगे, जामगा मनोज पवार, हाडगा पुरुषोत्तम वाघमारे , जाऊ, पटेल , तूपडी विशाल गोरे आदी उपस्थित होते

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR