सेलू : कवी कालिदासांचे मेघदूत हे लिहिण्याच्या संस्कृतीचा वारसा सांगणारे असून ते चिरतरुण काव्य आहे. यात तत्कालीन सामाजिक परिस्थिती, स्त्री वेदना, मनाची घुसमट, कुचंबना, तारूण्य, प्रेम, जीवनशैली वाचायला मिळते, असे प्रतिपादन नूतन कन्या प्रशालेतील संस्कृत विषयाचे सहशिक्षक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित एक दिवस एक पुस्तक या उपक्रमाच्या विसाव्या भागात ते कवी कालिदास यांच्या मेघदूत या पुस्तकावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. महेंद्र शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन महाविद्यालयातील संस्कृतचे प्रा. मोहन पाटील यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले की, कवी कालिदास यांचे मेघदूत हे वाचकांना गुंतवणून ठेवणारे आहे. पती पत्नीच्या भावनिक नात्यांची उकल हे पुस्तक वाचताना होते. पुढे प्रा. पाटील म्हणाले की, अलौकिक प्रतिभेचे धनी कवी कालिदास यांचे लेखन हे संस्कृत साहित्याला देणगी आहे. कवी कालिदासाचे मेघदूत हे पतीपत्नीच्या हळुवार प्रेमाची आणि विरहाची कथा आहे. ही कथा काळजाचा ठाव घेते.
मेघदूत वाचनाने नवतारूण्य प्राप्त होते. डॉ. शिंदे यांनी अध्यक्षिय समारोप केला. कार्यक्रमात पवन फरकांडे यांचा वरिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुरेश हिवाळे यांनी केले. सुत्रसंचलन प्रणिता सोलापुरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. के.डी.वाघमारे यांनी केले. कार्यक्रमास स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खारकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर मुळावेकर, डॉ. शरद ठाकर, शशिकांत देशपांडे, भालचंद्र गांजापुरकर, विनायक धामणगावकर, प्रा.आर.एम.खाडप, प्रा. हेमचंद्र हडसनकर, रश्मी बाहेती, सुलभा बागले, ज्योती कुलकर्णी, प्रा. सुभाष बिराजदार, डॉ. जयश्री सोन्नेकर, डॉ. राजाराम झोडगे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, प्रा. अनंत मोगल यांची उपस्थिती होती.