23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरकाँग्रेसने संविधानाची कास सोडली नाही

काँग्रेसने संविधानाची कास सोडली नाही

लातूर : प्रतिनिधी
पंडित जवाहरलाल नेहरू नंतर खासदार राहूल गांधी यांनीही देश एक ठेवण्यासाठी भारतीय संविधानाची कास सोडली नाही. आमदार अमित देशमुखही संविधान टिकले पाहिजे, या भूमिकेतून काम करत असल्याने आपणही त्यांच्या बाजूने उभा राहिले पाहिजे, अशी जाहिर भूमिका माजी आमदार कपिल पाटील यांनी मांडली. जी २४, भारत जोडो अभियान, निर्भय बनो जनआंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा निवडणूक २०२४ : एक आव्हान या विषयावर माजी आमदार कपिल पाटील बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार होते. यावेळी बरकत काझी यांची उपस्थिती होती.
इस्ट इंडिया कंपनीने ज्या पध्दतीने फोडा आणि राज्य करा जसे धोरण राबविले तसे धोरण भाजपाचे सरकार दोन-तीन उद्योगपतींना घेवून राबवत आहे. या धोरणाचा खासरदार राहूल गांधी यांनी जोरदार विरोध करत ९० टक्के लोकांची बाजू मांडत आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या मागे राहिले पाहिजे, असे सांगून पाटील म्हणाले की, लोकसभेला आंबेडकरी समाजाने संविधानाच्या बाजूने मतदान केले. अन्य समाजानेही अशा प्रकारे देश, लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी नागरीक म्हणून मतदान केले पाहिजे. आमदार अमित देशमुख संविधान टिकले पाहिजे या बजूने असल्याने त्यांच्या बाजूने आपणही उभा राहिले पाहिजे. कारण त्यांचे लातूरच्या विकासाचे मॉडेल हे सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारे आहे. याच विचाराने काम करीत राहिलो, तर महाराष्ट्रात सत्ता येणार आहे. महाराष्ट्रात सत्ता आली तर देशातील सरकार सुध्दा जाईल. यासाठी जी २४ चांगले कार्य करेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी काझी म्हणाले की, २०१४ पूर्वी निवडणूका विकासाच्या मुद्यावर होत होत्या. त्यानुसार मतदानही होत होते. २०१४ नंतर धर्म आणि जातीवर निवडणूका होत आहेत. हे देशाच्या शांतीसाठी चांगली बाब नसल्याचे सांगून जी २४ ही संघटना देशाला बरबाद करणा-यांच्या विरोधात काम करत असल्याचे सांगीतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन औरंगे यांनी केले. तर आभार नरसिंग घोडके यांनी मानले. यावेळी जी २४ संघटनेचे माधव बावगे, उदय गावारे, राजकुमार होळीकर, गणेश गोमारे, प्रा. अशोक नारनवरे, रामराजे आत्राम आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR