15.7 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रकांदिवलीत महिलांसाठी पहिले फिरते स्नानगृह

कांदिवलीत महिलांसाठी पहिले फिरते स्नानगृह

मुंबई : प्रतिनिधी
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत गुरुवार ९ जानेवारी रोजी कांदिवली पूर्व येथे महिलांसाठी भारतातील पहिल्या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या फिरत्या स्रानगृहाचे उद्घाटन करण्यात आले. हे स्रानगृह दिवसातून १२ तास सुरू राहील.

दरम्यान, कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर येथे सदर उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून एका बसमध्ये अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले स्रानगृह उभारण्यात आले. या बसमध्ये एकूण ५ स्रानगृहे आहेत, शॉवर आहेत, २१०० लिटर इतकी पाण्याची क्षमता आहे, बेसिन आणि इतर आवश्यक सुविधा आहेत. विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना आपले कपडे वाळवण्यासाठी २ ड्रायर मशीन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्युत पुरवठ्यासाठी येथे जनरेटर्सचा वापर करण्यात येणार आहे. अयामधील स्वच्छता राखण्याची जबाबदारी मात्र नक्कीच आता महिला नागरिकांची असेल.

महिला कर्मचा-यांचीही नियुक्ती
पाण्याचा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच योग्य नियोजनातून सर्वांना स्रानगृहाचा वापर करण्याची संधी मिळावी यासाठी या स्रानगृहात महिला कर्मचारीसुद्धा नियुक्त करण्यात येणार आहेत. येथे प्रत्येक महिलेला ५ ते १० मिनिटे इतका वेळ स्रानासाठी दिला जाईल आणि वेळ झाल्यावर पाणी पुरवठा बंद होणार आहे.

‘स्वच्छ भारत अभियाना’ला हातभार
यामुळे अनेक गरजू महिलांची समस्या सुटू शकते आणि झोपडपट्टीत राहणा-या महिलांना व्यवस्थित आंघोळ करता येईल त्याशिवाय परिसर स्वच्छ राहण्यास मदत होऊन ‘स्वच्छ भारत अभियाना’ला देखील हातभार लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR