25.3 C
Latur
Sunday, May 25, 2025
Homeलातूरकाकाज् प्रतिष्ठानचा गुणगौरव राज्यास दिशादर्शक

काकाज् प्रतिष्ठानचा गुणगौरव राज्यास दिशादर्शक

लातूर : प्रतिनिधी
लातूरमध्ये घडणा-या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी सर्वतोपरी सहकार्य  करण्याची परंपरा येथील नेतृत्वाने आजवर जोपासली आहे, ही परंपरा पुढे कायम पणाने चालवली जाईल, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले.  काकाज् प्रतिष्ठान व एसपी पब्लिकेशन आयोजित राज्यस्तरीय काकाज गुणगौरव सोहळयाच्या उद्घाटन प्रंसगी आमदार अमित देशमुख बोलत होते. काकाज् प्रतिष्ठान व एसपी पब्लिकेशनच्या वतीने राज्याचे सहसंचालक सुधाकर माधवराव तेलंग पाटील लिखीत इंद्रधनू एक दृष्टिक्षेप काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आले. चाकुर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी दिलीप हैबतपुरे यांचा सेवापुर्ती सोहळा व राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव करण्यात आला.
यावेळी आमदार विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राचार्य महादेव गव्हाणे, आरसीसीचे प्रा. शिवराज मोटेगावकर, व्दारकादास शामकुमारचे तुकाराम पाटील, लक्ष्मीकांत कर्वा, प्राचार्या डॉ. भगिरिथी गिरी, रमेश बिरादार, ज्ञानोबा भोसले, माजी महापौर प्रा. स्मिता खानापुरे, अ‍ॅड. किरण जाधव, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, सहायक अभियंता राहुल गाडे, अशोक काळे , विधीज्ञ अ‍ॅड. आकाश जाधव, डॉ. विकास सोळूंके, सपनाताई किसवे, सरपंच रेशमा माधव गंभीरे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अनंत सुर्यवंशी, बाबासाहेब भिसे, संदेश पनाळे इत्यादी मान्यवरांना राज्यस्तरीय गुणगौरव सोहळयात सन्मानित करण्यात आले. तसेच काकाज् सेमी इंग्लिश स्कूलचा दुस-या वर्षीही १० वीचा १०० टक्के निकाल लागला असुन यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार अमित देशमुख व आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार काळे म्हणाले की, काकाज् प्रतिष्ठान व एसपी पब्लिकेशन आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा हा राज्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी वर्गामध्ये उत्साह निर्माण करणारा असुन अधिकारी वर्गाच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. सहसंचालक सुधाकर तेलंग, प्रा. शिवराज मोटेगावकर व इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. प्राचार्य विनोदकुमार धुमाळ यांनी प्रास्ताविक करताना काकाज् प्रतिष्ठान व एसपी पब्लिकेशनचे कार्य शैक्षणिक परिवर्तनाची नांदी असणार आहे. त्यातूनच महाराष्ट्राला शैक्षणिक क्षेत्रात वेळोवेळी दिशा दर्शक ठरली असून यापुढेही सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक पैलूचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात येईल. आभार प्रदर्शन विजयकुमार धुमाळ यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR