25.1 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeपरभणीकान्हेगाव येथून ६० हजारांचा गुटखा जप्त

कान्हेगाव येथून ६० हजारांचा गुटखा जप्त

पूर्णा : तालुक्यातील कान्हेगाव येथील एका किराणा दूकानदाराच्या घरावर पूर्णा पोलिसांच्या पथकाने दि.३ रोजी छापा टाकला. या कारवाईत ६० हजार रुपये किंमतीचा गुटखा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुटखा बाळगणा-या विलास पारटकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी पूर्णा शहरातील गुटखा माफीयांचे धाबे दणाणून सोडल्यानंतर गुटखा माफीयांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कान्हेगांवात एक किराणा दुकानदार आपल्या दुकानातुन गुटखा तस्करी करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच दि.३ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विलास घोबाडे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि.वडजे, जमादार रमेश मुजमुले, पोकॉ.पांडुरंग वाघ, पोकॉ.खनपटे, मपोशी. पलमटे आदींनी कान्हेगांव येथील विलास संभाजी पारटकर याच्या किराणा दुकानाची झाडाझडती घेण्यासाठी गेले असता तो घटनास्थळावरुन पसार झाला.

पोलीसांनी दुकान तसेच घरात तपासणी केली असता २३ हजार ७१६ रुपये किंमतीचा राज निवास पानमसाला सुगंधी तंबाखूच्या समावेश असलेला गुटखा, ४ हजार १८५ रुपयांचा प्रिमीअर जर्दा, ३० हजार ५९४ रुपये किंमतीचा गोवा व विमल नामक गुटखा असा एकुण ५८ हजार ४९५ रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला. पोलीसांनी मुद्देमाल ताब्यात घेऊन पारटकर विरोधात पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि.नांदगावकर हे करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR