23.3 C
Latur
Friday, May 23, 2025
Homeमहाराष्ट्रकार दरीत कोसळून १ ठार, ८ प्रवासी गंभीर

कार दरीत कोसळून १ ठार, ८ प्रवासी गंभीर

पुणे : प्रतिनिधी
पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणा-या महामार्गावर सोमवारी (२७ जानेवारी) सकाळी एका कारचा भीषण अपघात झाला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव कार १०० फूट खोल दरीत कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार, महाडवरून नऊ प्रवाशांना घेऊन कार भोरकडे निघाली होती. पहाटे ४ वाजता कार वरंधा घाटात उंबर्डे गावाच्या हद्दीत असताना कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार १०० फूट खोल दरीत कोसळली.

कारचा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मदत कार्य सुरू केले. यात एक मृतदेह आणि ८ जखमींना बाहेर काढण्यात आले. या घाटात सातत्याने अपघाताच्या घटना घडतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR