37.2 C
Latur
Sunday, April 27, 2025
Homeराष्ट्रीयकाश्मिरात ट्रेकिंग मोहिमेला स्थगिती

काश्मिरात ट्रेकिंग मोहिमेला स्थगिती

जम्मू : वृत्तसंस्था
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील ट्रेकिंग मोहिमांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. स्थानिक अधिका-यांनी पहलगामच्या वरच्या भागात, चंदनवारी, अरु, बेताब व्हॅली आणि बैसरन व्हॅलीसह पर्यटक आणि ट्रेकर्स मोहीम आधीच थांबवली. पहलगामच्या सर्व वरच्या भागात कोणत्याही प्रकारच्या पर्यटन मोहिमा, ट्रेकिंगवर सध्या पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

दरवर्षी हजारो लोक जम्मू आणि काश्मीरमध्ये ट्रेकिंगसाठी येतात. यामुळे या भागात पर्यटकांची मोठी वर्दळ होती. उन्हाळ््याच्या काळात गर्दी वाढते. कारण त्यावेळी बर्फ वितळतो आणि ट्रेकिंगचे मार्ग खुले होतात. आता अचानक आलेली ही बंदी केवळ ट्रेकिंग प्रेमींसाठी धक्का नाही तर स्थानिक पर्यटन उद्योगासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करत आहे. स्थानिक मार्गदर्शक, पोर्टर, होमस्टे मालक आणि दुकानदार जे प्रामुख्याने ट्रेकिंग हंगामावर अवलंबून असतात, त्यांनाही या निर्णयाचा आर्थिक फटका बसत आहे.

परिस्थिती सामान्य
होईपर्यंत बंदी
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि लष्कराने संयुक्तपणे सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. उंचावरील भागात अतिरिक्त गस्त वाढविण्यात आली आहे आणि ड्रोनद्वारे देखरेख केली जात आहे. आता परिस्थिती सामान्य होईपर्यंत ट्रेकिंगवर बंदी राहील, असे सांगण्यात आले.

ट्रेकिंग परवानेही रद्द
ट्रेकिंग परवानेदेखील निलंबित करण्यात आले आहेत आणि आधीच जारी केलेले परवाने रद्द करण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR