32.5 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeमहाराष्ट्रकुणाल कामरा, सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल

कुणाल कामरा, सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल

मुंबई : कुणाल कामरा याचे गाणे पुन्हा सुषमा अंधारे यांनी म्हटले. मुख्यमंत्री यांनी निवेदन केले असतानाही परत ते गाणे म्हटले आहे, हा सभागृहाचा अवमान आहे. म्हणून, आपण सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग आणत आहोत, असे आमदार रमेश बोरनारे यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणताना म्हटले.

कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या ‘नया भारत’ या कॉमेडी शोमधून शिवसेना पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता बोचरी टीका केली होती. एका गाण्याचे विडंबन करत कामराने एकनाथ शिंदेंच्या दाढी, चष्म्यावरून आणि शिवसेना पक्षातील बंडावरून निशाणा साधला होता.

कॉमेडियनचा हा व्हीडीओ तुफान व्हायरल झाला असून शिवसैनिक संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. तर, काही शिवसैनिकांनी कुणाल कामराने जिथे हे गाणं गायलं तो स्टुडिओही फोडल्याचे दिसून आले. तसेच, कामराविरुद्ध मुंबईतील काही पोलिस ठाण्यांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे विरोधकांनीही हा व्हीडीओ शेअर करत या टीकेचे समर्थन केले. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा ते गाणं म्हटल्याचा व्हीडीओही समोर आला होता. त्यामुळे, आता विधिमंडळ सभागृहात याचे पडसाद उमटले असून कुणाल कामरा व सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR