मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा महायुती सरकारवर खुलासा करण्याची वेळ आली आहे. कोकाटे यांचे वक्तव्य दुर्दैवी असून सरकारच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली आहे.
कोकाटे यांनी असे वक्तव्य करायला नको होते. ते असे बोलले असतील तर आम्ही माफी मागतो, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतक-यांना मदत करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. यावर कोणी राजकारण करू नये, असा सल्लाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.