27 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रकेंद्रीय गृहमंत्रालयाची पूरग्रस्त राज्यांना मदत

केंद्रीय गृहमंत्रालयाची पूरग्रस्त राज्यांना मदत

महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटी रुपयांचा निधी

मुंबई : प्रतिनिधी
पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या १४ राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या राज्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काही मागितले की ते लगेचच मिळते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यातील शेतक-यांसाठी १४९२ कोटींचे पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतक-यांचा उल्लेख नेहमीच अन्नदाता असा करतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही संकटात शेतक-यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार व्यक्त केले. या मदतीमुळे पूरग्रस्तांना मदत देणे सुलभ होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR