26.9 C
Latur
Saturday, March 29, 2025
Homeमहाराष्ट्रकोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी

कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी

कोल्हापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांना धमकावणा-या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला २८मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरची सात दिवसांची कोठडी मागितली होती. पण न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे.

दरम्यान, शिवरायांच अवमान केन्या प्रकरणी प्रशांत कोरटकरची कोल्हापूर कोर्टात आज सुनावणी झाली. पोलीस प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाबाहेर आणत असताना शिवप्रेमी त्याच्या अंगावर धावून गेले. पण त्याचवेळी सर्तक असलेल्या पोलिसांनी रोखलं. म्हणून पुढची अप्रिय घटना टळली. वेगवेगळ्या घटनांचा तपास करायचा असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी हवी असा युक्तीवाद कोल्हापूर पोलिसांच्यावतीने कोर्टात करण्यात आला.

इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी सुद्धा सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली. प्रशांत कोरटकरने ज्या मोबाईल फोनचा वापर केला, तो आता पोलिसांना हस्तगत करायचा आहे. त्याचा जो प्रवास झाला, त्याला कोणी-कोणी मदत केली? ते पोलिसांना शोधून काढता येईल. पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. ज्या-ज्यावेळी पोलिसांना तपासात आवश्यक असेल, तेव्हा सहकार्य करु असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. पण कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR