25.7 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeराष्ट्रीयकोर्ट कचेरीसाठी सरकारने खर्च केले ४०० कोटी

कोर्ट कचेरीसाठी सरकारने खर्च केले ४०० कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्­वाखालील केंद्र सरकारने गेल्­या १० वर्षात न्यायालयातील केसेससाठी ४०० कोटीहून अधिकचा खर्च केला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये न्यायालयीन बाबींसाठी केंद्र सरकारने ६६ कोटींचा खर्च केला. ही रक्­कम गतसालापेक्षा ९ कोटींनी अधिक आहे. नुकत्­याच झाालल्­या बजेट सेशनमध्ये विचारलेल्­या एका प्रश्नाला सरकारने दिलेल्­या उत्तरातून ही आकडेवारी समोर आली आहे.

सरकारने दिलेल्­या उत्तरामध्ये असे म्­हटले आहे की, २०१४-१५ पासून सरकारच्या न्यायप्रविष्­ट असलेल्­या प्रकरणासाठी खर्च करण्यात आलेल्­या रक्­कमेमध्ये वाढ होत आहे. सविस्­तर आकडेवारी पाहिली तर असे लक्षात येते की २०१४-१५ मध्ये यासाठी २६.६४ कोटी तर २०१५-१६ मध्ये हाच खर्च ३७.४३ कोटी इतका झाला होता. हा खर्च कोविडच्या दोन वर्षात कमी झाल्­याचे आकडेवारीतून दिसून येते.

याबरोबरच विधी मंत्रालयाने सांगितले होते की, केंद्र सरकार देशभरातील विविध न्यायालयांमध्ये जवळपास ७ लाख प्रलंबित केसेसमध्ये पक्षकार म्­हणून समाविष्­ट आहे. यापैकी २ लाख दावे हे केवळ अर्थमंत्रालयाशी संबधित आहेत. केंद्र सरकारच्या छीँ’ कल्लाङ्म१ें३्रङ्मल्ल टंल्लँीेील्ल३ & इ१्रीा्रल्लॅ र८२३ीे (छकटइर) च्या संस्­थेचा अहवाल घेऊन कायदामंत्री अर्जून मेघवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली.

मेघवाल यांनी पुढे सांगितले की सरकार या न्यायप्रविष्­ट प्रकरणांबाबत उपाययोजना करत आहे. यासाठी एक मसुदा तयार केला असून हा प्रस्­ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे. या प्रस्­तावावर ही न्यायप्रविष्­ट प्रकरणे कशी लवकर निकालात काढली जातील याबाबत विचार करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR