23.5 C
Latur
Wednesday, May 21, 2025
Homeमहाराष्ट्रकोल्हापूर जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण

कोल्हापूर जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण

कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर महापालिका हद्दीतील ८३ वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. १२ मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले आहेत.

देशात एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २५७ वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक ९५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये ६६, महाराष्ट्रात ५६ आणि कर्नाटकात १३ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईतही कोरोनाचा शिरकाव झाला असून त्या पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील एका ४० वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली असून, त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहूवाडी तालुक्यातील एका ४० वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. २० मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या सर्वांची प्रकृती सुधारत असून ते लवकरच बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला.

सोमवारी मुंबईतील केईएम रुग्णालयात २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. तथापि, डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्यांचा मृत्यू कोविडमुळे नाही तर दीर्घकालीन आजारांमुळे झाला. एका रुग्णाला तोंडाचा कर्करोग होता आणि दुस-याला नेफ्रोटिक सिंड्रोम, मूत्रपिंडाचा आजार होता.

आशियात वेगाने पसरणारा कोरोनाचा नवीन प्रकार
दरम्यान, आशियातील सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. या देशांमध्ये नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. सिंगापूरमध्ये १ मे ते १९ मे दरम्यान ३ हजार रुग्णांची नोंद झाली. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही संख्या ११ हजार १०० होती. येथे रुग्णांमध्ये २८ टक्के वाढ झाली. जानेवारीपासून हाँगकाँगमध्ये ८१ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ३० जणांचा मृत्यू झाला आहे. चीन आणि थायलंडमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. तथापि, येथील रुग्णांच्या संख्येबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. १ जानेवारी ते १९ मे या कालावधीत भारतात २५७ रुग्ण आढळले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR