रेणापूर : प्रतिनिधी
कार व अज्ञात वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला. सदर घटना लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव तांडा (ता. रेणापूर ) येथे गुरुवारी दि ११ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली असून सदर अपघातात कारला कोणत्या वाहनाने धडक दिली. याबाबत पोलिसांकडून माहिती उपलब्ध झाली नाही अंबाजोगाई कडून लातूरकडे जाणारी ईरटीका सुझुकी कंपनीची कार क्रमांक एमएच २४ एके ००९० ही रेणापूर तालुक्यातील कोळगाव तंड्याजवळ गुरुवारी दि ११ पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.या कारला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.
कार आणि अज्ञात वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात कारमधील मल्लिकार्जुन मन्मथप्पा कनडे, राहूल मल्लीकार्जुन कनडे या या पिता-पुत्राचा मृत्यू झाला. ते लातूर येथील रहिवाशी आहेत. कारच्या चालकाचा झोपेमुळे कारवरील ताबा सुटल्याने वाहनास पाठीमागून धडक दिली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान अपघातस्थळी केवळ कार उभी असल्याचे दिसून आले तर अज्ञात वाहन तेथून पुढे निघून गेले. ते देवदर्शनासाठी शिर्र्डी येथे गेले होते. ते लातूरकडे परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. सदर अपघाताबाबत रेणापूरचे पोलिस निरिक्षक अशोक अनंत्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारचा अपघात झाला असून कारमधील गंभीर जखमी दोघांचा मृत्यू झाला आहे मात्र आमच्याकडे याबाबत माहिती आली नाही असे त्यांनी सांगितले.