18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयखासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात वॉरंट जारी

खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात वॉरंट जारी

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात खटल्याची सुनावणी झाली. भोपाळमधील भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विरोधात कोर्टाने १०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असून कोर्टाच्या आदेशानंतरही त्या सुनावणीसाठी हजर झाल्या नव्हत्या.

खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना कोर्टाने हजर राहण्यास सांगितले होते. यासंदर्भात आदेश देऊनही त्या कोर्टात हजर राहिल्या नाहीत. दरम्यान, खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वकिलाने प्रकृतीच्या कारणास्तव हजर राहण्यापासून सूट मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता, परंतु कोर्टाने तो फेटाळला आणि जामीनपात्र वॉरंट जारी केले, जे २० मार्च रोजी परत केले जाऊ शकते. दरम्यान, २००८ मध्ये महाराष्ट्रातील मालेगाव शहरात एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक लोक जखमी झाले. दरम्यान, या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसकडून करण्यात आला. त्यानंतर नंतर २०११ मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले होते. याप्रकरणी २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जामीन मंजूर केला होता.

भाजपाने तिकीट कापले
२ मार्च रोजी भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील एकूण २९ लोकसभा जागांपैकी २४ उमेदवारांचाही समावेश आहे. यात भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे तिकीट भाजपाने कापले आहे. त्यांच्या जागी भोपाळचे माजी महापौर आलोक शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR