17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeक्रीडागंभीर आळशी माणूस

गंभीर आळशी माणूस

नवी दिल्ली : प्रतिनिधी
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अनेकदा सामन्यादरम्यान खूप गंभीर दिसतो. गौतम गंभीर मनमोकळेपणाने हसताना दिसणे फार कमी आहे. याशिवाय गौतम गंभीरची प्रतिमा अशी आहे की तो खूप मेहनती आहे परंतु तो कधी कधी खूप आळशी बनतो असे सत्य दिनेश कार्तिकने उघड केले आहे.

दरम्यान, गौतम गंभीरच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त दिनेश कार्तिकचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिनेश कार्तिक या खेळाडूच्या आळशीपणाची कहाणी सांगत आहे. दिनेश कार्तिकने या व्हिडिओमध्ये सांगितले की, ‘वर्ष २००२ मध्ये गौतम गंभीर टीम हॉटेलच्या रूममध्ये पडलेला होता. त्याचा दरवाजा किंचित उघडा होता. मी त्याच्या खोलीतून बाहेर येत होतो आणि मग अचानक गंभीरने मला हाक मारली. जेव्हा मी गंभीरच्या खोलीत गेलो, तेव्हा त्याने मला त्याच्या टीव्हीचे चॅनल बदलण्यास सांगितले.

दिनेश कार्तिक पुढे म्हणाला, गंभीरकडून हे ऐकून मला धक्काच बसला. रिमोट त्याच्यापासून दोन पावले दूर होता, पण हा खेळाडू त्याच्या जागेवरून हलत नव्हता. यापेक्षा आळशी माणूस मी कधीच पाहिला नाही. मी चॅनल बदलला आणि त्यानंतर गौतम गंभीरने मला तिथून जाण्यास सांगितले. हा किस्सा ऐकून इरफान पठाण आणि हरभजन सिंगलाही हसू आवरता आले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR