21.5 C
Latur
Thursday, August 28, 2025
Homeमहाराष्ट्रगणेश उत्सवानिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्र

गणेश उत्सवानिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्र

मुंबई : प्रतिनिधी
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंची चर्चा आहे. ५ जुलैला विजयी मेळाव्यात दोन भाऊ एकत्र आले होते. त्यानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले होते. आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपतीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले होते.

दरम्यान, सध्या सर्वत्र गणरायाचे आगमन होत आहे. याच निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे असे सगळेजण राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उपस्थित झाले होते. त्यांनतर ठाकरे बंधू यांचे स्रेहभोजनही झाले. राज ठाकरेंच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करुन गणपतीसाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारुन उद्धव ठाकरे हे आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते.
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.

उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थवर
राज ठाकरे हे यापूर्वी दादरच्या शिवाजी पार्कमधील कृष्णकुंज या वास्तूमध्ये राहत होते. मात्र, तीन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी नवं घर बांधलं. राज ठाकरे याठिकाणी राहायला आल्यावर अनेक राजकीय नेते शिवतीर्थवर येऊन गेले होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात दुरावा आल्याने उद्धव ठाकरे हे कधीही शिवतीर्थवर आले नव्हते. मात्र, आता गणपतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या घरी आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR