25.3 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रगुन्हेगार अजूनही मोकाट

गुन्हेगार अजूनही मोकाट

मामाच्या हत्येवर योगेश टिळेकर यांचा संताप

पुणे : प्रतिनिधी
माझ्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मी, माझी आई आणि कुटुंब खूप मोठ्या धक्क्यात आहे, अशी भावूक प्रतिक्रिया योगेश टिळेकर यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांचे अपहरण करून निर्घूण खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (९ डिसेंबर ) सकाळी घडली. उरळीकांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मामांचे अपहरण झाल्यानंतर पोलिसांच्या तपासात मृतदेह सापडला आहे. पोलिस यंत्रणा अतिशय सक्षमपणे काम करत आहे. लवकरच पोलिस खूनामागचे कारण शोधतील. माझ्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मी, माझी आई आणि कुटुंब खूप मोठ्या धक्क्यात आहे. पोलिस सहकार्य करत आहेत. गुन्हेगारांवर पोलिस कारवाई करतील,’’ अशी अपेक्षा योगेश टिळेकर यांनी व्यक्त केली.

सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. मांजरी परिसरातील एका हॉटेलजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास ते उभे होते. त्यावेळी पांढ-या रंगाच्या कारमधून अपहरणकर्ते तेथे आले. त्यांनी जबरदस्तीने वाघ यांना कारमध्ये बसवले. ही कार सोलापूरच्या दिशेने भरधाव निघून गेली. हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला. वाघ बराच वेळ झाले तरी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला.

वाघ यांचा मोबाईल बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. आमदार टिळेकर यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार व अन्य वरिष्ठ अधिका-यांना ही बाब सांगितली.

वाघ यांना घेऊन अपहरकर्ते सोलापूरच्या दिशेला गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले होते. हडपसर पोलिसांनी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस तसेच सोलापूर व अहिल्यानगर पोलिसांना माहिती दिली. वाहनाचे वर्णन कळवले. हडपसर पोलिस ठाण्यासह शहर पोलिस दलाची पाच पथके व शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने तपास सुरू केला. खुनाचे नेमके कारण समजलेले नाही. हल्लेखोरांच्या शोधासाठी पुणे, नगर व सोलापूर परिसरात पोलिसांची पथके पाठवण्यात आली. वाघ यांचे कोणाशी वाद होते का, त्यांना कोणी धमक्या दिल्या आहेत का? याबाबतचा तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR