31 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeमहाराष्ट्रगोपीनाथ मुंडेंनी चाबकाने फोडले असते

गोपीनाथ मुंडेंनी चाबकाने फोडले असते

बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो आणि व्हीडीओ समोर आल्यानंतर राज्यभर तीव्र संताप उसळला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करत, बीडमधील गुंडांनी राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर लघवी केली आहे, गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडेंना चाबकाने फोडले असते अशी जळजळीत टीका केली.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील घटनेनंतर विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विशेषत:, या प्रकरणात आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याच्या आरोपांमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हे फोटो आणि रिपोर्ट काल आमच्याकडे आले, पण दोन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे हे फोटो पोहोचले असतील. मग त्यांनी धाडसी निर्णय का घेतला नाही? असा सवाल करत, त्यांनी सरकारवर आरोपींच्या पाठीशी उभे राहिल्याचा आरोप केला.

या प्रकरणावर संताप व्यक्त करत रोहित पवार म्हणाले, थोरले मुंडे आज असते, तर त्यांनी धनंजय मुंडेंना चाबकाने मारले असते. तसेच, पंकजा मुंडे यांनाही या प्रकरणावर समोर येऊन भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR