32.5 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeराष्ट्रीयगोळ््यांना तोफगोळ््याने उत्तर!

गोळ््यांना तोफगोळ््याने उत्तर!

पंतप्रधान मोदींचा इशारा, ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानमधून गोळ््या झाडल्या तर भारतातून तोफगोळे डागले जातील, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला. ऑपरेशन सिंदूर थांबणार नसून ते सुरूच असल्याचे भारताने स्पष्ट केले. तसेच अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर नव्हे तर भारताने स्वत:च्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा केल्याची माहितीही भारताने दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देशाच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची बैठक आज पार पडली. या बैठकीत त्यांनी शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारले, असे सांगत हम उनको मिट्टी मे मिला देंगे, असे म्हटले. तसेच तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, असे मोदी म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानवर अशा जखमा केल्या आहेत, ज्या भरून येण्यास बराच वेळ लागेल. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि ९ दहशतवादी तळ आणि पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केल्या.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जगभरातील मित्र राष्ट्रांशी चर्चा केली होती. त्यावेळी ज्या देशांशी चर्चा केली, त्या सर्व देशांना यावेळी कठोर कारवाई केली जाईल, अशी कल्पना दिली होती. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी छावण्यांवर हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानलाही माहिती दिली होती. ७ मे २०२५ रोजी सकाळी डीजीएमओ स्तरावर ही माहिती देण्यात आली. दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तरात्मक कारवाईची माहिती दिली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानसोबत युद्धबंदी झाल्यानंतर भारत सरकारने स्पष्ट केले की, पाकिस्तानसोबत राजकीयदृष्ट्या, परराष्ट्र व्यवहार मंत्री किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर कोणतीही चर्चा होणार नाही. पाकिस्तानशी चर्चा फक्त डीजीएमओ पातळीवरच होईल. हा स्पष्ट संदेश भारताने जगाला दिला. याचा अर्थ असा की मध्यस्थीसारख्या कोणत्याही गोष्टीला वाव नाही.

स्वत:च्या अटींवर
युद्धबंदीची घोषणा
पाकिस्तानने युद्धबंदी आणि अमेरिकेशी चर्चेची विनंती केल्यानंतर भारताने स्वत:च्या अटींवर युद्धबंदीची घोषणा केली. युद्धबंदीपूर्वी ९ मे २०२५ च्या रात्री अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला.

पाकचे ८ एअरबेस उडविले
भारताची भूमिका स्पष्ट होती, जे की पाकिस्तानने काहीही केले तर आम्ही त्याला योग्य उत्तर देऊ. यानंतरही १० मे रोजी रात्री पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणी हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर भारताने पाकिस्तानला योग्य उत्तर देत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या ८ एअरबेसना लक्ष्य केले.

दोन्ही देशांत आज होणार चर्चा
युद्धबंदी करारानुसार आता १२ मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात डीजीएमओ यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेत शस्त्रसंधी, दहशतवाद या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे या चर्चेतून नेमका काय तोडगा निघणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. भारत या चर्चेला जाताना काही ठोस अटी समोर ठेवून जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR