26.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमनोरंजनगोविंदाचा ३७ वर्षांचा संसार मोडणार?

गोविंदाचा ३७ वर्षांचा संसार मोडणार?

मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळे राहतात. याचा खुलासा सुनीता अहुजाने एका मुलाखतीत केला होता. आता गोविंदा आणि सुनीता घटस्फोट घेत वेगळे होणार असल्याच्या चर्चा आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदा आणि सुनीता अहुजा ३७ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गोविंदाचे एक्स्ट्रा मरेटिअल अफेअर असल्याने त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. अभिनेत्याचे नाव ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. त्यामुळे गोविंदा आणि सुनीताचा ३७ वर्षांचा संसार मोडणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप याबाबत अभिनेत्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

गोविंदा आणि सुनीताने १९८७ साली लग्न करत संसार थाटला होता. त्यांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत. गोविंदा आणि सुनीता हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल होते. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिले जायचे. मात्र आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR