22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल, सीबीएसई बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकाल

ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल, सीबीएसई बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकाल

लातूर : प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा येथील ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे.  वैभव भातांबरेकर ९८ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम तर सोहम लाळे ९५ टक्के द्वितीय व वरद सोळुंके ९४.२० टक्के गुण घेऊन तृतीय तर मुलींमध्ये वेदिका चव्हाण ९५ टक्के प्रथम तर रचना बन ९४.२० टक्के  गुण घेत द्वितीय येण्याचा मान मिळवला.
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यशाची उज्वल परंपरा शाळेने कायम राखली आहे. शाळेची सर्व मुले प्रथम श्रेणी ने उत्तीर्ण झाली आहेत. त्यामध्ये विषय वाईज निकाल पाहता गणित विषयात शंभर पैकी १०० गुण घेणारे १ विद्यार्थी तर ९० पेक्षा जास्त गुण घेणारे १४  विद्यार्थी,  समाजशास्त्र विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण घेणारे १ विद्यार्थी व ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे २६ विद्यार्थी तर हिंदीमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे ३६ विद्यार्थी इंग्रजी व विज्ञान या विषयांमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे सात सात विद्यार्थी अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रमेश बिरादार, सुयश बिरादार सुजित बिरादार प्राचार्य आम्रपाली सरवदे, प्रशासकीय व्यवस्थापक सगरे रामेश्वर, उपप्राचार्य किरण देशपांडे, शिक्षक रेश्मा देशमुख, रामेश्वरी कदम, वाघअंबर उबाळे, ज्योतीराम पवार यासह इतर सर्व शिक्षक  इतर कर्मचा-यांनी मुलांचे अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR