27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरघरणी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला

घरणी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला

नळेगाव : वार्ताहर
चाकुर तालुक्यातील नळेगाव येथील घरणी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला असून परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. चाकूर तालुक्यातील नळेगाव व परिसरातील ४० गावांसाठी वरदान ठरलेल्या तसेच शेतीत सिंंचनाच्या माध्यमातून समृध्दी आणणारा घरणी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाला असून परिसरातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. घरणी मध्यम प्रकल्पाची क्षमता २५.५४ दशलक्ष घनमीटर असून शिरूर अनंतपाळसह नळेगाव व परिसरातील ४० गावांना बारमाही पाणी पुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पावर परिसरातील दोन ते तीन हजार शेतकरी अवलंबून आहेत. घरणी प्रकल्प १००% भरल्यामुळे नळेगाव, देवंग्रा, सुगाव, हिप्पळगाव, शिवपुर, शिरूर अनंतपाळ, उजेड, ंिलंबाळवाडी व अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून परिसरातील नागरिक व शेतकरी आनंद व्यक्त करीत आहेत.
घरणी प्रकल्पावर नळेगाव, सुगाव, देवंग्रा, हिप्पळगाव, शिवपूर,शिरूर अनंतपाळ, उजेड, ंिलबाळवाडी आदींसह ४० गावे अवलंबून आहेत. या घरणी मध्यम प्रकल्पावर महत्वाचे मोठे मत्सबीज केंद्र चालते. चाकुर तालुक्यातील नळेगाव येथील घरणी मध्यम प्रकल्पातून मे महिना अखेर पर्यंत ६ लाख ४१ हजार घनमीटर गाळ उपसा केल्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. सदरील घरणी मध्यम प्रकल्प भरल्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व सिंंचनाचा प्रश्न मिटला आहे. यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR