लातूर : प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी औसा रोड, दत्तनगर परिसरातील घरचा कडीकोंडा तोडून आत मध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिन्याची चोरी केल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे अज्ञात आरोपीता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील आरोपीना २ लाख ४७ हजार रुपयाच्या मुद्देमालासह अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना सदरच्या पथकाला नमूद घराचे कडे कोंडा तोडून चोरी करणा-या आरोपीची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून दिनांक १२ एप्रिल रोजी पथकाने छत्रपती चौक ते पाच नंबर चौक कडे जाणा-या रोड वरून तीन आरोपींना ताब्यात घेतले त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव विजय सुभाष बिरारे, वय २७ वर्ष, राहणार विष्णुनगर, जवाहर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर] रामेश्वर उर्फ पाप्या सूर्यकांत बजगुडे, वय २३ वर्ष, राहणार गणेश नगर,जुना औसा रोड, लातूर, सागर सुनील गायकवाड, वय २८ वर्ष,राहणार ड्रायव्हर कॉलनी, जुना औसा रोड,लातूर असे असल्याचे सांगितले.
त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ त्यांनी चोरी केलेले सोन्याच्यांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण २ लाख ४७ हजार मुद्देमाल असल्याचे कबूल केले. सदरचा मुद्देमाल पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील दोन तर विवेकानंद चौक हद्दीतील एक घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणारा आरोपी विजय सुभाष बिरारे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याचेवर संभाजीनगर येथे वेगवेगळ्या प्रकारेचे २३ गुन्हे दाखल असून तो लातूर येथे येवून त्याचे नमूद दोन साथीदारच्या मदतीने चोरीचे गुन्हे करत होता.