23 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रचंद्रपुरात मुसळधार; विद्युत तार तुटून ४ ठार

चंद्रपुरात मुसळधार; विद्युत तार तुटून ४ ठार

चंद्रपूर : प्रतिनिधी
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, या पावसामुळे विद्युत तार शेतात तुटून पडली होती. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने शेतात काम करण्यासाठी गेलेल्या चार शेतक-यांना विजेचा जोरदार झटका बसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूरच्या बह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर गावाच्या शेतशिवारात सदरची दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू होता. दरम्यान आज उघडीप असल्याने अनेक शेतकरी शेतात कामासाठी गेले होते. याच वेळी शेतात काम करीत असताना पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे व नानाजी राऊत या चार शेतक-यांना तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

पावसामुळे शेतात तार पडली
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिवंत विद्युत तारा शेतात पडून राहिल्यामुळे सदरची घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान घटनेची माहिती गावात समजताच गावक-यांनी शेताकडे धाव घेतली. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR