26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeलातूरचाकूरात उघड्यावर गोवंशाची कत्तल करणा-या दहा जणाविरूध्द गुन्हा

चाकूरात उघड्यावर गोवंशाची कत्तल करणा-या दहा जणाविरूध्द गुन्हा

चाकूर : प्रतिनिधी
चाकूर शहरात उघड्यावर गोवंशाची कत्तल केली जात असल्याप्रकरणी शुक्रवारी दि. ३१ मे रोजी दहा जणाविरूध्द चाकूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकूर शहरातील आर. बी. पाटील नगर या भागात उघड्यावर गोवंशाची कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक राजेश घाडगे, होनाजी चिरमाडे, विष्णु गुंडरे, योगेश मरपल्ले या कर्मचा-यांनी शुक्रवारी पहाटे चार वाजता या भागात छापा टाकला, यावेळी वेगवेळ्या ठिकाणी उघडयावर बसून गोवंशाची कत्तल केली जात असल्याचे दिसून आले. तसेच काही गोवंशी कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचे आठळून आले. त्यांच्याकडून दोन लाख ४७ हजार आठशे रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक चिरमाडे यांच्या तक्रारीवरून अजमत सत्तार कुरेशी, रौफ जमाल कुरेशी, सलीम जमाल कुरेशी, तजमुल सत्तार कुरेशी, सत्तार मोहमद कुरेशी, अजहर मस्जीद कुरेशी, खालीद अन्वर कुरेशी, दाऊद अन्वर कुरेशी, अयुब जहुर कुरेशी, नयुम अयुब कुरेशी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR