वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चार वर्षांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात ५३२ दिवसांची रजा घेतली. त्यांच्या एकूण कार्यकाळापैकी ४० टक्के दिवस रजेत गेले असून, त्यांनी ७९४ दिवस काम केले आहे.
या संदर्भात अमेरिकेतील दैनिकांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आहे. बायडेन यांनी पदभार स्वीकारून १,३२७ दिवस झाले आहेत. त्यांपैकी ५३२ दिवस त्यांनी रजा घेतल्या आहेत. अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने घेतलेल्या या सर्वाधिक रजा आहेत.
बायडेन यांनी प्रत्येक १० दिवसांमध्ये ४ दिवस रजा घेतली आहे. अमेरिकेत एखाद्या कर्मचा-याला सरासरी ११ दिवसांची रजा एका वर्षात मिळते. बायडेन यांनी जेवढ्या रजा घेतल्या, तेवढ्या रजा घेण्यास सर्वसामान्य नागरिकाला ४८ वर्षे लागतील.
जगभरात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहे. तरीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष समुद्रकिना-यावर रजेचा आनंद घेत आहेत. मात्र, बायडेन यांच्या सहका-यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष रजेवर असतानाही काम करत होते. महत्त्वाचे फोन कॉल्स ते घेत होते. त्यांना सहज संपर्क करता येत होता.