सोलापूर : खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पण पॅरोल रजेवर घरी आलेला आणि फरार झालेल्या आरोपीला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारासह अटक करत त्यांच्याकडील चार पिस्टल व २४ जिवंत काडतुस जप्त केली आहेत.
फाईक मुस्ताक कळमबेकर, राहणार शिवाजीनगर मिस्त्री विला रत्नागिरी या आरोपीला खूनाच्या गुन्ह्यात रत्नागिरीमध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे तसेच त्याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल आहेत. निंबोडा हनुमंत बिराजदार याला मंगळवेढ्यात एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा असून तो सध्या जामिनावर आहे व राजकुमार हनुमंत बिराजदार असे पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
राज्यात सध्या परवानाधारक व अवैद्य अग्नि शस्त्र वापरून होत असलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांचे लक्ष होते त्याचा अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांचे पथक जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्या मागे होते. त्यामध्ये वायकर व कॉन्स्टेबल प्रकाश कारटक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इसम नामे फारूक कळमबेकर हा जंगलगी तालुका मंगळवेढा गावच्या शिवारात राजकुमार बिराजदार यांच्या शेतात देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस बाळगून आहे अशी बातमी मिळाली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना केले. जंगलगी गावातील राजकुमार बिराजदार यांच्या शेतात इसमांवर वॉच ठेवून थांबले असता मिळालेल्या माहितीनुसार वर्णनाचा ही इसम दिसून आला व त्याच्या हालचालीवरून त्याच गराडा घालून जागीच पकडले.
त्या इसमाने आपले नाव फारूक कळमबेकर असे सांगितले. त्याला तपासले असता कमरेच्या डाव्या बाजूस पँट मध्ये खोचलेली एक देशी बनावटीचे पिस्टल मॅक्झिनसह व त्यांच्या उजव्या खिशातून पाच जिवंत काडतुस मिळून आले. त्याच्याकडून अधिक माहिती घेतली असता सदर आरोपी हा रत्नागिरी जिल्ह्यातील खूनाच्या गुन्हयात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती तो सदरची शिक्षा ही कळंबा जेल कोल्हापूर येथे भोगत असताना तेथून पॅरोल रजेवरून येऊन परत कारागृहात हजर झाला नव्हता.
पोलिसांना त्याचा ठाण टिकावा लागू नये म्हणून रत्नागिरी येथून प्रसार होऊन सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे बिराजदार यांच्या शेतात राहत होता त्यांच्याकडे मिळून आलेले पिस्टल हे त्यांनी निंगोडा बिराजदार यांच्याकडून घेतले होते.
यामुळे निंबोडा बिराजदार यास ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्याचा भाऊ राजकुमार बिराजदार यांच्या राहते घरात तीन बनावटी पिस्टल व 18 जिवंत काडतुस ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यावरून लगेच बिराजदार बंधू त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता घरामध्ये आणखी तीन बनावटी पिस्टल व 18 जिवंत काढतोस मिळून आले आहेत सदरचे पिस्टल हे विक्रीच्या उद्देशाने बाळगले असल्याचे निष्पन्न झाले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे व पथकातील हेड कॉन्स्टेबल प्रकाश कारटक, विरेश कलशेट्टी, अश्विनी गोटे, कॉन्स्टेबल अजय वाघमारे, हरीश थोरात, राहुल दोरकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार अन्वर आत्तार, बाळराजे घाडगे यांनी बजावली.