35.9 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रजरांगे पाटील यांची तब्येत खालावली

जरांगे पाटील यांची तब्येत खालावली

अंतरवाली सराटीत महिलांचा टाहो, उपोषण मागे घेण्यासाठी घातली गळ

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. यापूर्वी सुद्धा त्यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांच्या आग्रहाने त्यांना रात्रीच्यावेळी सलाईन लावण्यात आले होते. आज दुपारी त्यांची तब्येत पुन्हा खालावली. यावेळी महिलांच्या डोळ्यांतून अश्रुधारा येत होत्या. त्यांच्या टाहोमुळे वातावरण धीरगंभीर झाले. महिलांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.

उपोषणाचा आज नववा दिवस
मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या एक दिवस अगोदर १६ सप्टेंबरपासून उपोषणाचे हत्यार उपसले. त्यांच्या आंदोलनाला एक वर्ष उलटून गेले आहे. सरकारने त्यांना जी आश्वासनं दिली. त्यातील काहींची अंमलबजावणी झाली नाही. मुंबईच्या वेशीवर सरकारने सगेसोय-याचा अध्यादेश आणि ओबीसीमधून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देऊनही गेल्या सहा महिन्यांत त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले. आज त्यांची तब्येत खालावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR