26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रजरांगे यांच्यावर उपोषणाची वेळ येणार नाही : भाजप

जरांगे यांच्यावर उपोषणाची वेळ येणार नाही : भाजप

शिर्डी : प्रतिनिधी
नवीन सरकार आल्यावर मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरक्षणासाठी उपोषण करण्याची वेळ येणार नाही. नवीन सरकार ती परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे नवीन सरकार समोर मराठा आरक्षणाचा विषय प्राधान्यक्रमाने असणार असे संकेत मिळत आहेत.

भाजप नेते चंद्रकांत पाटील सहपरिवार शुक्रवारी साई दरबारी आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, सत्ता स्थापनेसाठी आम्हाला जागा कमी पडणार नाहीत. कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ यांच्या १६० जागा निवडून येतील. त्यानंतर महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय दिल्लीत तिन्ही पक्ष नेत्यांच्या बैठकीत होईल. आमची संघटना शिस्तीत चालते आहे, कशातच फूट पडली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा दिल्लीतील नेत्यांवर विश्वास आहे. तसेच जे जे आमच्या सोबत येतील त्यांना बरोबर घेऊ. परंतु सरकार बनवण्यासाठी कुणाला बरोबर घ्यावे लागणारच नाही.

आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली घटना मानतो. त्या घटनेच्या चौकटीत जे आहे ते आम्हाला मान्य आहे. घटनेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्हाला कधी न्याय मिळाला नाही आणि मिळू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेत ज्या संस्था म्हणजेच ईडी, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग आहे. परंतु या संस्था विरोधकांना मान्य नाहीत. एका बाजूने संविधान बचावचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे संविधानातील कुठलीच परंपरा मानायची नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR