अमरावती : प्रतिनिधी
मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्याला फार उशीर केला. एक तर कार्यकर्त्यांना अर्ज भरायला लावणे, ४ तारखेला आम्ही लिस्ट जाहीर करतो, असे सांगणे, नंतर पुन्हा दुसरी तारीख देणे, यामुळे कार्यकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाले. हे कार्यकर्त्यांनीही बोलवून दाखवले आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जरांगे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या घोषणेसंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, खरे तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जो काही निर्णय घेतला, त्याला फार उशीर केला. एक तर कार्यकर्त्यांना अर्ज भरायला लावणे. ४ तारखेला आम्ही लिस्ट जाहीर करतो, नंतर पुन्हा दुसरी तारीख देणे, यामुळे कार्यकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाले. हे कार्यकर्त्यांनी बोलूनही दाखवले. एक तर आपण सांगायला हवे होते की, निवडणूक लढणार नाही.
आता तुम्ही निवडणुकीचे २५ टक्के, ५० टक्के पार्ट झाल्यानंतर सांगत आहात की आता नाही लढत. यात ज्या कार्यकर्त्यांनी इकडून तिकडून पैसे आणून खर्च केले होते, त्यांना आर्थिक झळ बसली आहे.
निवडणुकीनंतर, सर्वांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच होईल आणि अशा परिस्थितीत आम्ही व्यवस्थित डाव मारू, असा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. ते अमरावतीत माध्यमांसोबत बोलत होते.