17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरजळकोट तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढणार

जळकोट तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढणार

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे यामुळे तालुक्यातील सर्व साठवण तलाव तसेच पाझर तलाव तुडुंब भरले आहेत. यासोबतच तिरू नदीवर उभारण्यात आलेल्या उच्च पातळी बंधा-यातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे यावर्षी जळकोट तालुक्यात  उसाच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ होणार आहे.
   जळकोट तालुक्यामध्ये जवळपास पंधरा साठवण तलाव आहेत. जळकोट तालुक्यामध्ये सन २०२२ व २०२३ यावर्षी अतिशय कमी पाऊस पडला होता. यामुळे साठवण तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत गेला. यावर्षीच्या उन्हाळ्यात तर सर्व साठवण तलाव कोरडे ठाक पडले होते . अनेक शेतक-यांनी पाऊस पडेल. या आशेवर मोठ्या प्रमाणामध्ये २०२३ मध्ये उसाची लागवड केली होती परंतु पाऊस पडला नाही आणि जलस्त्रोत म्हणावे तेवढे भरले नाहीत.
यावर्षीच्या उन्हाळ्यात  पाणीटंचाईची तीव्रता जाणवू नये यासाठी प्रशासनाने साठवण तलावावरील मोटारीचे कनेक्शन तोडले. यामुळे ज्या शेतक-यांंनी उसाची लागवड केली होती अशा शेतक-यांच्या ऊसाला पाणी न मिळाल्यामुळे ऊस जाग्यावर वाळून गेला तसेच अनेक शेतक-यांनी नवीन उसाची लागवड केली नाही व ज्या शेतक-यांंचा खोडवा ऊस होता तसेच ज्या शेतक-यांनी पहिल्यांदाच उसाची लागवड केली होती अशा शेतक-यांनी पाण्याअभावी आपला ऊस मोडला. या ठिकाणी सोयाबीन तसेच कापूस या पिकाची लागवड केली.
तालुक्यातील शेतकरी पूर्वी खरीप हंगामावर अवलंबून असायचा परंतु तालुक्यात मोठ्या प्रमाणात साठवण तलाव झाल्यामुळे डोंगराळ भागावरही हिरवळ फुलू लागली आहे. ऊस हे पिक नगदी पीक म्हणून ओळखले जाते तसेच ऊसाला भाव देखील चांगला असल्यामुळे शेतक-याांंना यातून चांगले उत्पन्न मिळते यामुळे जळकोट तालुक्यातील शेतकरी ऊस या पिकाकडे वळला आहे.
  जळकोट तालुक्यातील हळदवाढवणा, रावणकोळा, माळहिप्परगा,डोंगर कोणाळी, सोनवळा, हावरगा, चेरा १, चेरा २, गुत्ती, गुत्ती २, डोंगरगाव, केकतशिंदगी, जंगमवाडी, चाटेवाडी या ठिकाणचे साठवण तलाव शंभर टक्के भरले आहेत यामुळे या साठवण तलावाच्या क्षेत्रात येणा-या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उसाची लागवड यावर्षी केली जाणार आहे.   यासोबतच तिरु नदीवर सात उच्च पातळी बंधारे उभारण्यात आले असून या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे त्यामुळे तीरुनदी काठावरील शेत जमिनीवरही मोठ्या प्रमाणात
उसाची लागवड होण्याची शक्यता आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR