29.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरजळकोट तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

जळकोट तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

 जळकोट  : प्रतिनिधी
जळकोट तालुका ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतक-यांची कर्जमाफी करावी तसेच पिक विमा वाटप करावा. असे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत शासनास दि ९ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आले . जळकोट शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी,अतिवृष्टी होऊन शेतक-यांच्या शेतीचे पिकाचे व पशुधनाचे फार नुकसान झाले आहे. मागील चार वर्षापासून कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तसेच कधी पिकावर होणारा रोगांचा प्रादुर्भाव तर जीएसटी मुळे खते, बी, बियाणे, यांच्या वाढलेल्या किमती तसेच शेतक-यांच्या मालाल योग्य भाव मिळत नाही.
नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहन पर ५० हजार रुपये अनुदान शासनाने जाहीर केले होते, मात्र तेही दिले नाही  अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे. या मागण्या मान्य न केल्यास शेतकरी आक्रोश मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी  काँग्रेस चे जेष्ठ नेते मन्मथपा किडे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस उषाताई कांबळे , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुका अध्यक्ष नेमीचंद पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष मुक्तेश्वर पाटील, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीलाताई पाटील, पं.समितीचे माजी सभापती बालाजी ताकबिडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव जाधव, संचालक वश्विनाथ इंद्राळे, संचालक महेताब बेग, संचालक राजेश मोतेवाड,काकडे दत्तात्रेय, व्यंकट केंद्रे, ज्ञानोबा मालुसरे, गंगाधर गर्दिवाड, बालाजी पाटील, युवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज पाटील दळवे, राघोबा कांबळे, दिलीप पांचाळ, सुधाकर सोनकांबळे, शंकर आगलावे, चेअरमन रामदास परीट, बालाजी पांडे, तुकाराम सवारे, प्रकाश फाजगे पाटील, विश्वनाथ जाधव, सुरेश गव्हाणे, ईश्वर सोनटक्के, पांडुरंग वाकळे, पुंडलिक पाटील, नामदेव वाकळे, वेंकट नागरगोजे, धनराज लाळीकर, वैजनाथ चव्हाण, उमाकांत डांगे, दिगंबर सोनटक्के, आनंद आगलावे, मनोहर गोंड, संगमेश्वर बाबळसरे, राजेंद्र गव्हाणे, मोहन लोहकरे, हनुमंत आगलावे, शिवराज कपाळे, अर्जुन बाबळसरे, माधव घुले, धोंडीराम बडे, मुजमील मुंडकर, नागनाथ नागरगोजे, गोपाळ पाटील, विशाल पाटील, विनायक केंद्रे, आनंदी चट, पांडुरंग सूर्यवंशी, व्यंकट देवकते, शिवाजी राठोड, हावगी स्वामी आदी उपस्थित
होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR