जळकोट : प्रतिनिधी
राज्यातील ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी वेतनश्रेणी, निवृत्ती वेतन / ग्रॅज्युटी व वसुलीची / उत्पनाची जाचक अट रद्द करणे तसेच इतर मागण्यासाठी कामगार दिनी दि. १ मे २०२५ पासून ते २ मे २०२५ हे दोन दिवस जळकोट तालुक्यातील सर्व ग्रा.प. कर्मचारी यांच्यावतीने जळकोट पंचायत समितीसमोर काम बंद आंदोलन करण्यात आले .
राज्यातील २७९२० ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार, वीजपुरवठा कामगार कर वसुली कर्मचारी लिपिक ई. पदावर सेवेत आहेत. सुमारे ६०००० ग्रा.प. कर्मचारी अत्यल्प वेतनात काम करीत आहेत. कर्मचा-यांचे वेतनाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत याबाबत ग्रा.प. कर्मचा-यांनी अनेकदा आंदोलन मेळावे, मोर्चे, अधिवेशन केले आहेत. मुख्यमंत्री , ग्रामविकासमंत्री व कामगार मंत्री व बरेचशे आमदार आंदोलनात मोर्चास व आधिवेशानास उपस्थित राहून मार्गदर्शन केले व आश्वासन दिले होते. अनेकदा प्रशासकीय बैठका झाल्या. मात्र ग्रा.प. कर्मचा-यांच्या मागण्यासबंधी अद्यापही निर्णय झाला नाही. या मुळे राज्यातील ग्रा.प. कर्मचारी यांच्यात नाराजी पसरली आहे. कामगार दिनी आंदोलनाबाबतचे निवेदन सेनेच्या वतीने देण्यात आले होते.