19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रजातीयवादी शक्तीला पराभूत करू या

जातीयवादी शक्तीला पराभूत करू या

क-हाड : राज्यातील विधानसभा निवडणुकीत शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांची महाविकास आघाडी आणि दुस-या बाजूला संविधान व राज्यघटना मोडू पाहणा-या जातीयवादी भाजपमध्ये थेट लढत आहे. त्यामुळे ही दोन व्यक्तींची नव्­हे, तर दोन विचारांची लढत असल्याने क-हाडमधून आता तिस-यांदा जातीयवादी शक्तींना पराभूत करायचे आहे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. बुधवारपेठ येथील पदयात्रेनंतर महात्मा फुलेनगर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

आमदार चव्हाण म्हणाले, राज्य सरकारने अनेक पातळ्यांवर भष्टाचार चालवला आहे. मालवणमध्ये उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळला. या मंडळींनी छत्रपतींना सोडले नाही. ते तुम्हा-आम्हाला काय सोडणार. स्पर्धा परीक्षांतही या सरकारमुळे गोंधळ झाला. या शहराने समता आणि बंधुता जपणा-या विचारांची पाठराखण केली. विरोधकांकडे वाममार्गाने पैसा आला आहे.

ते या पैशाचा वापर मते विकत घेण्यासाठी करतील; परंतु क-हाडची जनता त्यांच्या पैशाची दहशत मोडून काढेल, असा मला विश्वास आहे. त्यांना तुम्ही दोनदा बाहेरचा रस्ता दाखवला. आता तिस-यंदा रस्ता दाखवण्यासाठी सज्ज राहा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR