25 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeलातूरजादा  मार्कची हमी देणारे ग्रामीण परीक्षा केंद्र बंद करा!

जादा  मार्कची हमी देणारे ग्रामीण परीक्षा केंद्र बंद करा!

लातूर : प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात सद्या  सर्वत्र नीट, जेईई, एमएचटी-सीईटी या प्रवेश पूर्व परीक्षेच्या तयारीचे वातावरण असून शासनाने या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १२ वी बोर्ड परीक्षेत किमान गुणांची अट निश्चित केली आहे. याचा गैरफायदा घेत विना मेहनत, विना अभ्यास जादा  गुण मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील काही शाळेंनी बोर्ड परीक्षा केंद्र मॅनेज करुन जादा  गुणांची हमी देण्याचा गोरख धंदा सुरु केला आहे. असे परीक्षा केंद्र बंद करावेत, अशी मागणी शहरी कनिष्ठ महाविद्यालय बचाव शिक्षक कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
जादा मार्काच्या हमीचा दुष्परिणाम शहरातील कनिष्ठ महाविद्याल्यावर होत असून मागील काही वर्षांपासून शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातून ग्रामीण भागात बोर्ड परीक्षेत सामुहीक कॉपी व गुणांची हमी देणा-या कनिष्ठ महाविद्यालयात नॉमिनल प्रवेश घेऊन खाजगी शिकवणीतून शिकणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परिणामी शहरातील कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्याविना बकाल होत आहेत. त्यामुळे परीक्षेत गैर प्रकार करणा-या परीक्षा केंद्राची व शाळेची मान्यता रद्द करावी या मागणीसाठी एकत्र येऊन  जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी,  शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यात शिक्षक कृती समितीचे अध्यक्ष प्रा. खपाटे एस. के., प्रा. मुद्दे डी. एम., प्रा. जाधव जी. एस., प्रा. सूर्यवंशी बी. एम., प्रा. मोरे सुभाष, प्रा. शेख ए. जे., प्रा. विशाल चव्हाण, प्रा. ठाकूर, प्रा. गाढवे एस. व्ही., प्रा. भुरे ए. आर., प्रा. मारकोले मनीषा, प्रा. क्षीरसागर एस. डी., प्रा. कादरी झेड. एस., प्रा. चव्हाण एस. एच., प्रा. सूर्यवंशी ए. डी., प्रा. कैले व्ही. ए., प्रा. कांबळे एस. डी., प्रा. केडसे आर. डी. व इतर अनेक शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR