जालना : प्रतिनिधी
जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात झाला . ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन माय-लेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंजना पुरुषोत्तम सापनर (वय ३०) व अनुसया पुरुषोत्तम सापनर (वय १४, रा. धानोरा, ता. शेणगाव, जि. हिंगोली) अशी मयत माय-लेकींची नावे आहेत. अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान, बीडवरून जालन्याकडे येणारी ट्रॅव्हल आणि विरुद्ध दिशेने जाणा-या ऊसतोड कामगारांच्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमींना अंबड येथील शासकीय आणि जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.
जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर अंबड-वडीगोद्री रोडवर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या जालन्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.