लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागु झाली आहे. निवडणुक शांततेत पार पडण्यासाठी निवडणुकीच्या काळात ध्वनिक्षेपक वापरावर निवडणुक आयोगाने प्रतिबंध आणले आहेत. त्यामुूळे निवडणुक काळात जिल्ह्यात ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध घालण्यात आले असून त्याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकुर-घूगे यांनी निर्गमित केला आहे.
कोणत्याही वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून त्याचा वापर केवळ सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत संबंधीत पोलीस अधिका-यांची रितसर परवानगी घेऊन करता येईल., असा वापर करताना वाहन चालू ठेवून ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी अथवा निवडणुकीचे उमेदवार किंवा ध्वनीक्षेपकाचा वापर वाहनांवर बसवून किंवा अन्य प्रकारे करणा-या लोकांनी ध्वनीक्षेपकाच्या वापराचे परवानगी वितरण मतदारसंघ निवडणुक निर्णय अधिकारी व जवळच्या पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक राहील.वापरावर निर्बंध लागू