18.9 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeलातूरजीएसटी अभय योजनेत व्याज व दंड माफ 

जीएसटी अभय योजनेत व्याज व दंड माफ 

लातूर : प्रतिनिधी
मालमत्ताधारकांकडे असणारा थकलातूर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे वस्तू व सेवाकर अभय योजना २०२४ संबंधीत परिसंवाद दि. ११ डिसेंबर रोजी येथील वस्तू व सेवाकर भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यकर सहआयुक्त टी. जे. गडदे, राज्यकर उपायुक्त एन. व्ही. शेवाळकर, राज्यकर उपायुक्त डी. एस. मुके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या परिसंवादास सनदी लेखापाल, कर सल्लागार व लातूर तसेच धाराशिव वस्तू व सेवाकर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित  होते. यावेळी राज्यकर उपायुक्त शेवाळकर यांनी जीएसटी अभय योजना, तिचे स्वरुप, योजनेचे लाभ कोणाला मिळणार व तिची कार्यवाही याबद्दल सविस्तर माहिती दिली. ही योजना वर्ष २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या कालावधीमध्ये कराचा भरणा न झालेल्या व निर्धारण आदेश पारीत झालेल्यांना लागु राहणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या व्यापा-यांनी थकीत मुळ कराचा भरणा दि. ३१ मार्च २०१५ पूर्वी केल्यानंतर त्यांना त्या करावरील व्याज व दंडाची संपूर्ण माफी मिळणार आहे.  या परिसंवादात उपस्थितीत अन्य मान्यवरांनीही आपापले मनोगत व्यक्त करताना जीएसटी अभय योजनेविषयी माहिती दिली. परिसंवादास चांगला प्रतिसाद मिळाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR