सोलापूर : गुइलेन बॅरे सिंड्रोम’ च्या रुग्णावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल) रुग्णालयासह अन्य ११ रुग्णालयांत मोफत उपचार होणार आहेत. सिव्हिलमध्ये १० बेड राखीव ठेवले आहेत. या आजाराच्या रुग्णांसाठी ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे जीबीएस बाधित रुग्णांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
‘जीबीएस’ची सोलापुरातील रुग्णसंख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार खर्चिक असल्याने शहरासह जिल्ह्यातील १२ रुग्णालयात मोफत रुग्णांना उपचार मिळणार आहेत. बेड, व्हेंटिलेटर सज्ज आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता महात्मा फुले जनआरोग्य योजनेने या आजाराच्या उपचारासाठीचे तीन पॅकेज दिले आहेत. यात ४० हजार, ८० हजार आणि दोन लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. यासाठी १२ हॉस्पिटल निश्चित केले आहेत. ‘जीबीएस’वर सिव्हिल अन् खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरी गरीब योजनेंतर्गत सोलापुरात दोन दिवसांपूर्वी जीबीएस या आजाराने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेड, व्हेंटिलेटर राखीव ठेवले आहेत. रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
दोन लाखांपर्यंतच्या उपचारांसाठी मदत केली
जाईल. याचबरोबर खासगी अथवा सिव्हिल रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जीबीएस रुग्णांना ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही योजना असलेल्या १२ रुग्णालयात ‘जीबीएस’चे उपचार घेतल्यास ते पूर्णपणे मोफत होतील. त्यासाठी रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेतले जाणार नाहीत. त्यामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूर, काणे यांचे गायत्री हॉस्पिटल पंढरपूर, पंढरपूर सुपर स्पेशालिटी आयसीयू आणि गॅलेक्सी हॉस्पिटल पंढरपूर, ट्यूलिप हॉस्पिटल पंढरपूर, कदम हॉस्पिटल अकलूज, जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी, सुविधा हॉस्पिटल बार्शी, गंगामाई हॉस्पिटल, आधार हॉस्पिटल, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, युगंधर हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांचा समावेश आहे.