24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रजुन्या पेन्शनवरून गोंधळ

जुन्या पेन्शनवरून गोंधळ

शिर्डी : प्रतिनिधी
जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकारी, कर्मचा-यांचा शिर्डी येथे आज मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली. यावेळी आक्रमक झालेल्या कर्मचा-यांनी केसरकर यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालायला सुरुवात केली. याप्रसंगी कर्मचा-यांनी जुन्या पेन्शनसाठी आग्रह धरत कार्यक्रम अर्धवट सोडून काढता पाय घेतला.

केसरकर यांनी सर्वप्रथम उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी जुनी पेन्शन योजना आणि नवी पेन्शन योजना याबाबत भाष्य केले. तसेच आतापर्यंत तुमच्या अडचणी दूर करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनीच केले आहे, असे सांगताना आपण शालेय शिक्षण सेवकांना लाभ दिला असल्याचे म्हटले. यावेळी केसरकर यांचे भाषण सुरू असताना काही उपस्थितांनी मध्येच उभे राहून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच जुनी पेन्शनची मागणी करत कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

यावेळी केसरकर यांनी कमी अनुदान असणा-या शिक्षकांनाही मदत करण्यासाठी समिती नेमली आहे. त्याचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होईल. पगाराच्या रकमेपेक्षा खर्च जास्त असल्याने यातून मार्ग काढू. केंद्र सरकारने जाहीर केलेली पेन्शन योजना सर्वांना माहीत आहे. मात्र, याबाबत संभ्रम पसरविला जात आहे. काही लोक इथे भाषण करून गेले असतील, ते सत्तेत असताना काही देऊ शकले नाहीत. मात्र, एकनाथ शिंदे यांना जबाबदारी समजते. एक सामान्य रिक्षावाला या पदावर बसला आहे, असे म्हणत नाव न घेता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

पेन्शनबाबत मार्ग काढू
जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन योजना बाबत चर्चा करून आपण मार्ग काढू. काही राज्यात जुनी पेन्शन देतो बोलले. मात्र, त्यांनी तुमच्याच पैशातून ती योजना राबवली. त्यामुळे आपण सर्व एकत्र बसून यात सुधारणा करू. तुमचे शिष्टमंडळ घेऊन या, आपण चर्चा करून मार्ग काढू. शिक्षकांच्या टप्पा अनुदानाबाबतही लवकरच जी. आर. काढणार आहोत, असे केसरकर म्हणाले.

जुनी पेन्शन योजना लागू करू : ठाकरे
महाराष्ट्रात सगळीकडे थेर चालू आहेत. सरकारकडे शेतक-याला द्यायला पैसे नाहीत. आपले सरकार आल्यानंतर आपण जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत, असा शब्द माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR