31.6 C
Latur
Friday, April 25, 2025
Homeलातूरजेईई-मेनमध्ये प्रा. मोटेगावकर यांची ‘आरसीसी’ महाराष्ट्रात अव्वल 

जेईई-मेनमध्ये प्रा. मोटेगावकर यांची ‘आरसीसी’ महाराष्ट्रात अव्वल 

लातूर : प्रतिनिधी
प्रा. मोटेगावकर यांचे ‘आरसीसी’ नीट व जेईईसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नुकत्याच इंजिनिअरिंग प्रवेशासाठी असलेल्या जेईई मेन्स  परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये ‘आरसीसी’ ने पुन्हा एकदा आपण नंबर १ असल्याचे सिद्ध केले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने इंजीनियरिंग प्रवेश पात्रतेसाठी घेण्यात येणा-या राष्ट्रीय पातळीवरील जेईई-मेन परीक्षेमध्येसुद्धा मोटेगावकर सरांच्या ‘आरसीसी’च्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे यामध्ये कार्तिक अशोक गुप्ता (९९.६३) योगेश उमेश शिरसागर (९९.५२) सृष्टी भगवान खरात (९९.०३)सौरव मधुकर शिंदे (९९.६०) आणि प्रसाद प्रमोद वाघ (९९.४०) यांनी सर्वाधिक १००  पैकी ९९ पर्सेंटाइल पेक्षा अधिक गुण घेतले आहेत तर २० विद्यार्थ्यांनी अनुक्रमे ९८ पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत तर शेकडो विद्यार्थ्यांना ९० पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. फिजिक्स विषयात १३ विद्यार्थ्याना,केमिस्ट्री विषयात १७ विद्यार्थ्याना व अतिशय अवघड अशा मॅथेमॅटिक्स विषयात ३ विद्यार्थ्याना ९९ पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.विद्यार्थी व पालकांचा नीट पेक्षा जेईई साठी तुलनात्मक ओघ कमी  असतो तरीही कमी विद्यार्थी संखेतून तब्बल २५६ पेक्षा जास्त विद्यार्थी जेईई एडवांस साठी पात्र झाले  आहेत.
या घवघवीत यशाबद्दल ‘आरसीसी’ पॅटर्नचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा लैपटॉप देऊन सत्कार केला. तसेच पात्र विद्यार्थ्यांनी अ‍ॅडव्हान्स परीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा दिल्या. अ‍ॅडवांस परीक्षेत उत्तीर्ण होऊन यशस्वी विद्यार्थ्यांची भारतातील नामांकित समजले जाणा-या  आयआयटी, एनआयटी, बिट्स इत्यादी कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR