39.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रज्यांना काही उद्योग शिल्लक नाही, तेच हिंदी भाषेचा विरोध करतात

ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही, तेच हिंदी भाषेचा विरोध करतात

अजित पवारांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका

पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी भाषा सक्तीबाबत भाष्य केले .ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही, ते हिंदी भाषेला विरोध करतात, असा हल्लाबोल त्यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता केला.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात १८ एप्रिल रोजी महानगरपालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिवीर चापेकर स्मारक लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालय कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथे पार पडला. यावेळी सदर क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहरातून नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर राहून लोकार्पण सोहळ्याचा आनंद घेतला आहे.

यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मराठी ही आपली मातृभाषा आहे. ज्यांना काही उद्योग शिल्लक नाहीत, ते हिंदी भाषेचा विरोध करत आहेत. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, तसेच इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. तिन्ही भाषा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हिंदीला विरोध करण्याचं काही कारण नाही.

मराठी आपली मातृभाषा आहे आणि काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडं काही उद्योग नाही, ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत, असा टोला देखील अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला आहे. तर नाशिक दंगली प्रकरणात आम्ही कुठल्या पार्टीचा कार्यकर्ता म्हणून केस दाखल करत नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करत आहोत. कुणालाही सोडलं जाणार नाही, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR