25.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeझारखंडमध्ये भाजप ठरला मोठा भाऊ!

झारखंडमध्ये भाजप ठरला मोठा भाऊ!

रांची : वृत्तसंस्था
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचं जागावाटप निश्चित झालं आहे. या निवडणुकीत आजसू १० जागांवर तर जेडीयू २, चिराग पासवान यांच्या एलजेपीला १ आणि उर्वरित ६८ जागांवर भाजप निवडणूक लढविणार आहे. केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे निवडणूक प्रभारी शिवराज स्ािंह चौहान यांनी याबाबत घोषणा केली.

झारखंडमध्ये भाजपच्या नेतृत्वात एनडीएकडून ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन, जनता दल(यू) आणि लोकजनशक्ती पार्टी मिळून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. या ठिकाणी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे.

आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंडचे भाजप सहप्रभारी हेमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले की, ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढली जाणार आहे. भाजप ६८ जागांवर निवडणूक लढेल तर आजसूला १० जागा देण्यात आल्या आहेत. आजसू पक्षाला देण्यात आलेल्या जागांमध्ये सिल्ली, रामगड, गोमिया, इचागड, मांडू, जुगसलिया, डुमरी, पाकुड, लोहरदगा, मनोहरपूर या जागांचा समावेश आहे. तर जेडीयूला जमशेदपूर पश्चिम, तमाड आणि चतरा येथील जागा चिराग पासवान यांच्या पक्षाला दिली आहे.

झारखंडमध्ये किती जागांवर लढत?
दरम्यान, छोटा नागपूरच्या पठारवरील जंगलांनी वेढलेल्या झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागांसाठी लढत होणार आहे. विधानसभेत सरकार आणण्यासाठी ४२ जागांचे बहुमत आणावे लागेल. मागील २०१९ च्या निवडणुकीत ३० जागा ज्ािंकून झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष बनला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR