लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त लातूर शहरातील दिपज्योती नगर येथील प्रो टर्फ येथे रविवारी बँक कर्मचारी यांच्या वतीने टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव गोविंदपुरकर, राजकुमार पाटील, पृथ्वीराज शिरसाठ, अनुप शेळके, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव, लातूर महापालिकेचे झोनल ऑफिसर बंडू किसवे, पत्रकार हरिराम कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेत बँकेच्या १६ संघानी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाल्यावर टॉस करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी बँकेच्या कर्मचा-यांनी तुफान फलंदाजी व गोलंदाजी करत उपस्थित पाहुण्याकडून खेळाडूंचे टाळयांचा गजर करत सामन्यात रंगत आणली होती.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बँकेच्या अधिकारी कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. यावेळी बँकेचे उपसरव्यवस्थापक बब्रुवान पवार, विजय हरिदास, रामदास देशमुख, राम जाधव, अंगद मगर, संजय माने, राजेश मोरे, अमोल सुर्यवंशी, सचिन उटगे, वैभव काकडे तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.