36.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रटेम्पोची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा मृत्यू

टेम्पोची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापुरातील राधानगरी येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दिवाळीचा बाजार करून घरी परतणा-या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. येळवडे ते राशिवडेदरम्यान एका दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव टेम्पोने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. अखेर उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

संजय वसंत कांबळे (वय ४८) आणि सुरेखा संजय कांबळे (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत. मृत दाम्पत्याला चार मुली असून ते राधानगरीतील पुंगाव येथे वास्तव्यास होते. संजय यांचा सेंट्रिंगचा व्यवसाय होता. तर, त्यांची पत्नी भोगावती-परिते येथे एका दुकानात कामाला होत्या, दरम्यान, संजय आणि सुरेखा हे मंगळवारी संध्याकाळी दिवाळीची खरेदी करून घरी परतत होते.

मात्र, राशिवडे-येळवडेच्या सीमेवर आल्यानंतर येळवडेकडून माल उतरून राशिवडेकडे निघालेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, संजय आणि सुरेखा जवळपास ३० फूट लांब फरफटत गेले आणि टेम्पो उजव्या बाजूच्या नाल्यात पडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR