27.7 C
Latur
Thursday, May 22, 2025
Homeमनोरंजनट्युमरच्या त्रासाने दीपिकाची प्रकृती खालावली

ट्युमरच्या त्रासाने दीपिकाची प्रकृती खालावली

मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेत्री दीपिका कक्कड लिव्हर ट्युमरने ग्रासली आहे. आता तिला ताप आला असून प्रकृती खालावली आहे. चाहते दीपिका लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, अभिनेत्री दीपिका कक्कड सध्या कठीण काळातून जात आहे. दीपिकाला ट्युमर झाला आहे. दीपिकाची प्रकृती सध्या बिकट असून त्यावर तिचा पती आणि अभिनेते शोएब इब्राहिम यांनी माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या यकृतात टेनिसच्या चेंडूच्या आकाराचे ट्युमर आहे. ट्युमरच्या वेदनांदरम्यान तिला तापही आला.

त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शोएब इब्राहिमने त्याच्या अलीकडील यूट्यूब ब्लॉगमध्ये दीपिकाच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्याने सांगितले की, तापामुळे दीपिकाची शस्त्रक्रिया लांबणीवर गेली आहे.

शोएबने त्याच्या व्लॉगमध्ये सांगितले, मी यापूर्वी अपडेट देऊ शकलो नाही कारण मी व्यस्त होतो. दीपिकाची शस्त्रक्रिया अजून बाकी आहे आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत. दीपिकाने मागील वेळी जेव्हा आम्ही रुग्णालयात गेलो होतो, तेव्हा काही चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर दीपिकाने रुहानचे दूध सोडवले आहे. आम्हाला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात जायचे होते. पण दीपिका आजारी पडली आणि तिला तीव्र ताप आला.

अभिनेत्याने पुढे सांगितले की, दीपिकाचा ताप १०३ अंशांपेक्षा जास्त होता. याशिवाय तिला शरीरात खूप वेदना देखील होत होत्या. तिने अनेक औषधे घेतली, पण त्यावेळी कोणतीही औषधे परिणामकारक ठरली नाहीत. शोएब इब्राहिमने हेही सांगितले की, आता दीपिकाला बरे वाटत आहे. त्यामुळे डॉक्टर सोमवार, २६ मे रोजी तिच्या ट्युमरची शस्त्रक्रिया करू शकतील.
यासह, शोएबने सर्वांना दीपिकासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आणि सर्व काही ठीक होईल अशी आशा व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR