27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमनोरंजनडिप्रेशनच्या काळात ३ सुपरस्टार्सनी केली मदत

डिप्रेशनच्या काळात ३ सुपरस्टार्सनी केली मदत

हनी सिंगने केला खुलासा

नवी दिल्ली : गायक-रॅपर यो यो हनी सिंगने भारतीय संगीत उद्योगाला अनेक उत्तम गाणी दिली आहेत. आजही लोक त्याच्या ‘लुंगी डान्स’, आणि ‘पार्टी ऑल नाईट’ सारख्या अनेक गाण्यांवर नाचतात. हनी सिंगने आपल्या टॅलेंटमुळे बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र कारकीर्दीच्या शिखरावर असताना एक वेळ अशी आली की त्याची तब्येत बिघडली. तो डिप्रेशनमध्येही गेला. त्यावेळी बॉलिवूडच्या तीन सुपरस्टार्सनी त्याला मदत केली.

द लॅलनटॉपच्या मुलाखतीदरम्यान, हनी सिंगला त्याच्या सर्वांत वाईट अवस्था आणि आरोग्याच्या संकटाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी इंडस्ट्रीतील कोणत्या मित्रांनी मदत केली होती, असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला. त्यावेळी हनी सिंग म्हणाला, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि शाहरूख खान यांचे सतत फोन यायचे. ते माझ्या घरच्यांना माझ्या तब्येतीबद्दल विचारायचे त्यावेळी मला बोलताही येत नव्हते, असे हनी सिंग म्हणाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हनी सिंग अनेक वर्षे इंडस्ट्रीपासून दूर होता, त्यावेळी त्याच्यावर दीर्घ उपचार झाले. आता तो पूर्णपणे बरा झाला असून, पुन्हा एकदा आपल्या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकत आहे.

दरम्यान, हनी सिंगने आपल्या गाण्याने खूप प्रसिध्दी मिळवली आहे. २०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटासाठी हनी सिंगने ‘लुंगी डान्स’ हे गाणे तयार केले होते. या चित्रपटात शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होते. ‘लुंगी डान्स’ हे गाणे त्यावेळी खूप लोकप्रिय झाले होते. आजही लोकांना हे गाणे खूप आवडते. तर अभिनेता अक्षय कुमारसाठीही हनीने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR