20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रडीजी रश्मी शुक्ला भाजपचा अजेंडा चालवत आहेत; पटोले

डीजी रश्मी शुक्ला भाजपचा अजेंडा चालवत आहेत; पटोले

मुंबई : प्रतिनिधी
डीजी रश्मी शुक्ला भाजप आणि आरएसएसचा अजेंडा चालवत आहेत, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.
शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा करण्यात आला आहे.

दरम्यान, गेट वे ऑफ इंडिया परिसरात असणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संबोधित केले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सिंधुदुर्गात पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी स्वत: पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री आले होते. मूर्ती बनवण्याचा नियम आहे, परवानगी घ्यावी लागते. हे शिवविरोधी लोक आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांचे कारण आणि डीजी पदावर महिला अधिका-याची नियुक्ती का करण्यात आली आहे. डीजी रश्मी शुक्ला भाजप आणि आरएसएसचा अजेंडा चालवत आहेत, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.

तसेच या महायुती सरकारकडून शिवरायांच्या प्रतिमेचा वारंवार अपमान होत आहे. तसेच हे सरकार भ्रष्टाचारी असल्याचे देखील पटोले यावेळी म्हणाले आहेत. तसेच शरद पवार आणि शाहू महाराज हे दोन्ही नेते तब्येत ठीक नसताना देखील आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR